मासिक पाळीच्या संशयावरून विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी; चित्रा वाघ संतापल्या ‘लज्जेचा बाजार मांडत असतील तर…’
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील आर.एस. दमानिया इंग्लिश स्कूलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्यानंतर, मासिक पाळीच्या संशयावरून शाळेच्या व्यवस्थापनाने 10 ते 12 विद्यार्थिनींना त्यांची अंतर्वस्त्रे काढून तपासणी केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला. या निंदनीय घटनेवर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Chitra Wagh
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
“शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरून 14 ते 15 वयोगटातील तब्बल 12 विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला. हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे कृत्य आहे. मासिक पाळी आली म्हणजे काय गुन्हा नाही. पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसिमा गाठणं म्हणजे लज्जास्पद बाब आहे. ही घडलेली घटना केवळ अमानवी नाही, तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक अपमान आहे,’ असं चित्रा वाघ म्हणाल्या.
Chitra Wagh | ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील आर.एस. दमानिया इंग्लिश स्कूलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्यानंतर, मासिक पाळीच्या संशयावरून शाळेच्या व्यवस्थापनाने 10 ते 12 विद्यार्थिनींना त्यांची अंतर्वस्त्रे काढून तपासणी केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला. या निंदनीय घटनेवर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.