Home > chitra wagh
मासिक पाळीच्या संशयावरून विद्यार्थिनींची विवस्त्र तपासणी; चित्रा वाघ संतापल्या ‘लज्जेचा बाजार मांडत असतील तर…’
10 July 2025 2:56 PM ISTठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील आर.एस. दमानिया इंग्लिश स्कूलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्यानंतर, मासिक पाळीच्या संशयावरून शाळेच्या व्यवस्थापनाने 10 ते 12 विद्यार्थिनींना त्यांची अंतर्वस्त्रे काढून तपासणी केल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला. या निंदनीय घटनेवर भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.